आवर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आवर

nilesh dattaram bamne
आवर

माझ्यातील स्वैराचारास
कदाचित आवर घालायची ती
म्हणून नकोशी वाटायची
मला बंधने धर्माची
संस्कृती अन नैतिकतेची...

तुलना जेव्हा करतो मी
स्वताची इतरांशी
तेव्हा मलाच भीती वाटते
माझ्यातील नैतिकतेची...

धर्माने दिला मज दैववाद
संस्कृतीने दिला मज संस्कार
नैतिकतेने दिला मज परोपकार
काढून टाकता अंगरखा
धर्म संस्कृती अन नैतिकतेचा
पाहतो आरशात जेव्हा
दिसतो माझा मलाच मी
रुपात राक्षसाच्या...

आधुनिकतेचा पोशाख
चढविताच अंगावर
होतो स्वार्थी हव्यासी
अन मी लंपट...

वाहिले गाठोडे विचारांचे मी
माझ्या पूर्वजांनी दिलेल्या
तरच अर्थ प्राप्त होईल
कदाचित माझ्या जगण्याला...

पुरुष मी आहे घोड्या समान
त्याची लगाम दिली होती
देवाने स्त्रीच्या हाती
ती लगाम होती
धर्म संस्कृती अन नैतिकतेची
ती लगाम हातून सुटता स्त्रीच्या
माझ्यातील पुरुष आजही उधळतो
घोड्या समान
आणि मग शिकार ठरते स्त्रीच
माझ्यातील पुरशी अहंकार
आणि कधी - कधी वासनेची....

कवी - निलेश बामणे