प्राण मुलींचे वाचवा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्राण मुलींचे वाचवा

Shivaji Khade
प्राण मुलींचे वाचवा

मुलगीच आहे
नव निर्मितीची धनी
सदा असेल मातृत्व
फक्त तिच्या मनी

आज सोनुली मुलगी
आई उद्याची असेल
तिचा प्राण घेतला
पिढी पुढची नसेल

नको नको रे माणसा
रीत निसर्गाची मोडू
कळी फुलण्या आधीच
तिला नकोस तू तोडू

तिला तोडशील तू
दशा जगाची होईल
तिच्या संपल्याने जग
सारे लयास जाईल

मुली श्रेष्ठ आहे
साऱ्या जगास दाखवा
माणूसपण जागवा
प्राण मुलींचे वाचवा

शिवाजी बळीराम खाडे
सावजी ले आउट
खामगाव
संपर्क : ९४०५७७८५७७