अंधार..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अंधार..

mnyaa

आठवतंय तुला ??
आपलं पाहिलं भांडण...
रागावून मी चालली होती..
पुन्हा न भेटायचं ठरवून...
तू मी घेतलेल्या सगळ्या शपथा मोडून...
माझी समजूत तू काढताना
तुझ्या गालावरचे अश्रू....
...मी हळूच पुसताना,
मी हळूच तुझ्या कुशीत शिरली होती...
आठवतंय तुला ??
आताही मी भांडतेय...स्वत:शीच
आताही मी शपथा घालतेय.....स्वत:लाच,
आताही मी तशीच रडतेय...
पण...
पण आता तू नाहीस माझे अश्रू पुसायला,
माझ्या कुशीत शिरायला....
आता आहेत......
....फक्त तुझे भास,
तुझ्या आठवणी,
आणि अंधार.......
तुझ्या आठवणींचा,
विरहाचा
आणि
कधीही न संपणार्या
वेदनांचा....