ओवते ग मणी..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

ओवते ग मणी..

Aditya jadhav
ओवते ग मणी..
_____________________

ओवते ग मणी
ग बाई मी ओवते ग मणी..

मी साजूक चंचला
नटखट निर्मळा..
राजस माझा सखा
कृष्ण सावळा सावळा..
बाई ग धनी माझा
बाई ग धनी..
ओवते ग मणी
ग बाई मी ओवते ग मणी...!!!

कुंकू माझ्या कपाळी
नेसूनी शालू जरतारी..
येणार माझा सखा
अधीर् मी सांच्यापारी..
वाट पाहते ग जनी
ओवते ग मणी
ग बाई मी ओवते ग मणी...!!!

तीन सांचेला गायी परतल्या
दूध दुभत्या झाल्या..
जात्यावर गाते बाई मी
तुकोबाची अभंगवाणी..
ओवते ग मणी
ग बाई मी ओवते ग मणी...!!!

ओवते ग मणी
ग बाई मी ओवते ग मणी...!!!

© आदित्य अ. जाधव...!!!
    संपर्क - ९४०४४००००४
अ.आ.ज