एक पूर्ण ती...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

एक पूर्ण ती...

Aditya jadhav
एक पूर्ण ती...
_____________


मी कधी अपूर्णच होतो
ती माझी पूर्णता होती..
मी असाच घडत होतो
ती मला घडवत होती...!!!

लाख शिखरे केले असतील मी पार
मी असाच कधीतरी यशस्वी होतो..
मी चुकलो जेव्हा कधी जीवनात या
मला धीर देण्या ती यशस्विनी उभी होती...!!!

लाजून ती बिलगली मला
लाजून मी बिलगलो तिला..
न कसला स्वार्थ होता
न कसला हेतू होता...!!!

मनात तिच्या प्रेमाचा ओलावा होता
मनात माझ्या तिचा आदर होता..
न कसला संशय होता
न कसला द्वेष होता...!!!

जरी मी साधाच असेन
तरी ती माझी राधाच होती ...
अनेक नात्यात दिसे रूप तिचे
त्यातच एक माझी आई होती,
एक माझी बहिण होती...!!!

मी एकच होतो
ती अनेक होती...
सोज्वळ ती क्षमाशील,
तर कधी
ती रणरागिनी जगाचीच होती...!!!

© आदित्य अ. जाधव...!!!
अ.आ.ज