इवलसं हृदय आहे

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

इवलसं हृदय आहे

anand

देईन म्हणतो काही तरी
पण, देण्यासारखं काय आहे
माझ्याकडं तुझ्यासाठी
इवलस हृदय आहे || १ ||

आजवर जगत आलो
पण, पदरामध्ये काय आहे
आता मात्र माझ्याकडे
तुझा प्रेमळ हात आहे || २ ||

अनेकजण भेटले मला
पण, मुखवट्याचेच दान आहे
आता मात्र माझ्यासाठी
तुझा चेहरा प्राण आहे || ३ ||

सगळं काही वाटत आलो
पण, हृदय मात्र शाबूत आहे
आता मात्र माझ्यासाठी
तुझं हृदय मालक आहे ||४||

जगलो होतो इतके दिवस
पण, प्रत्येक श्वास व्यर्थ आहे
आता मात्र तुझ्यासाठी
मरण्यालाही अर्थ आहे || ५ ||

                - आनंद कुलकर्णी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: इवलसं हृदय आहे

NIKHIL RANDIVE
ANAND SIR ITS REALLY VERY NICE........................
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: इवलसं हृदय आहे

Sanjay Mahajan
In reply to this post by anand
Sir

Really very nice poem
Raj
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: इवलसं हृदय आहे

Raj
In reply to this post by anand
mast kavita
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: इवलसं हृदय आहे

D. V. Patwardhan
This post was updated on .
In reply to this post by NIKHIL RANDIVE
इक लफ्जे-मुहब्बतका  अदना ये फ़साना है
सिमटे तो दिले-आशिक फैले तो जमाना है ||

खूपच छान
अभिव्यक्ति इंडिया