प्रेमाचा पुजारी

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्रेमाचा पुजारी

shital
वळूनी बघ सखे
एकवार मजला
तुज करिताच हा
प्रेम वेडा जाहला ||१||

झुरतोय मी तुजसाठी
किती दिस अन किती राती
आता शोधतोय औषध
निद्रा नाशेवारती ||२||

तुझ्या मागे धावत धावत
शर्यतीतला घोडा झालो
चक्क गेल्या वर्षी
 स्पर्धेत पहिला आलो ||३||

तुझ्यावर छाप पाडण्याकरिता
रंगेबेरंगी सदरे ल्यालो
परवाच्या सर्कशीत  तर
विदुषक म्हणूनच गणलो ||४||

एवढ सार केवळ
तुझ्यामुळ अनुभवलं
तुझ्यावर कविता करत करत
मी  मानस-तज्ञाच घर गाठल ||५||

आता तरी येशील का ?
मला भेटायला
निदान दवाखान्याच
भाड द्यायला ||६||

कारण मी आहे
प्रेमाचा पुजारी
 आणि
पैशाचा भिकारी ||७||
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: प्रेमाचा पुजारी

NIKHIL RANDIVE
REALLY TRUE..........