पाण्याचे ॠण

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पाण्याचे ॠण

manisha
पाण्याचे ॠण

पाण्याशिवाय शेतीचे वर्णन अशक्य आहे. ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला साद दिली आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हातांनी त्याच्या प्रयत्नांना दाद दिली आणि यातूनच डोळ्यासमोर उभे राहिले हिरवाईने नटलेले हिरवेगार शिवार.... डोळ्यांचे पारणे फेडणारे!!

अंकुरले बीज मातीत
नवा हुंकार जगण्याचा
ओल्या दवासवे दाटे
मनी पिकाचा उसासा

पिक फुलण्या मातीत
लागे पाण्याची गोडी
थेंब थेंब पाण्यातुनी
बहरली शेती सारी

आज नयनांत माझ्या
मावेना आभाळ
रान अंकुरले सारे
जणू माझेच माहेर

काय सांगू महती
माझ्या या शेताची
तंत्रज्ञानाच्या संगतीने
आली पिकाला भरती

नाही फिटणार कधी
पाण्याचे हे ॠण
निसर्गाची किमया मोठी
नाही त्याला रे अंत-र.

सौ. मनिषा किनगे

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पाण्याचे ॠण

Madhav Laidwar
Very Nice
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पाण्याचे ॠण

Madhav Laidwar
In reply to this post by manisha
Very Good