तुझ्याविना

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तुझ्याविना

Sameer Nikam
तुझ्याविना शोधी मी एकांत
भासे  मनाला तू जवळ  नसल्याची खंत
 
तुझ्याविना जीव माझा तळमळतो
जसे पाणीविना मासा गुदमरतो
 
तुझ्याविना मन माझे कुठे रमेना
घाली प्रदक्षिणा तुझ्या आठवणीना
 
तुझ्याविना नाही वाटे जगण्यात रस
तू जवळ असल्याचा होता मनाला सारखा भास
 
तुझ्याविना जीव झाला माझा अर्धा
तरी मनात सुरु राही तुझ्या आठवणीची स्पर्धा
 
तुझ्याविना नाही वाटे कशात गोडवा
आयुष्याच्या वाटेवर साथ तुझा हवा
 
तुझ्याविना नाही उरली जीवनात मजा
जणू न केलेल्या पापांची फेडतो आहे सजा