|
पहाट होताच पसरते सोनेरी किरणाची लाट
मग सुरु होतो साऱ्या पक्षांचा किलबिलाट
सजते सारे रान दवबिंदूच्या मोत्यात
नाही थांबले आता कोणी घरट्यात
दुपारच्या मध्यावर भाजे अंग उष्णवारा
मिळे आश्रय गारवा झाडांच्या छायेत सारा
मंदावला सायंकाळी सूर्याच्या तेजाचा थाट
आता शोधे पक्षी आपल्या परतीची वाट
सुरु होतो खेळ काजवांच्या लुकाचीपिचा
वाटे आवाज मधुर किरकिऱ्या रातकीड्याचा
पसरले चारही दिशा आता काळोखाचे साम्राज्य
उरले फक्त आता घनगोर शांततेचे राज्य
|