का कळेना..

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

का कळेना..

Sameer Nikam

का कळेना आज काल मन का कुठे रमेना
काही केल्या कशात हि जीव लागेना

का  कळेना  तुझ्यात मी गुंतलो
जग  हे  सारे  मी  विसरलो
 
का  होते अशी हि जीवाची होरपळ
तुला  आठवताच होते  मनात  का आठवणीची धावपळ

का कळेना एकटाच मी गालात हसतो
बालिश रूप तुझे ते मनाच्या आरश्यात मी पाहतो

का  कळेना  तुला  माझे  वागणे  वेड्या  सारखे
सारे  कळून  देखील का वागतेस  परक्या  सारखे

तुझ्या  विना  दुसरे  काही  सुचेना ...
करू  काय  मी  काही  कळेना.

सांग  तूच  कशी  घालू  समजूत  वेड्या  माझ्या  मनाला
नाहीतर तूच  दे  दोष  माझ्या फुटक्या  नशिबाला.

का  कळेना  कधी  कळणार  तुला  माझ्या  भावना ..
तुला कळे परियंत जातोय सोडून मी साऱ्यांना....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: का कळेना..

Pritam Patil
mast... :)