|
विसरुन जा
मोहरुन जा यशाने
बहरुन जा सुखाने
हर्शित हो आनंदाने
नव्या सहस्रकात
हरविले काही तर
नको मानु दु:ख
नवे काही मिळाल्यावर
मिळेल आपोआप सुख
युग नवे येत आहे
स्विकार कर त्याचा
युग जूने जात आहे
त्याग कर त्याचा
जुन्या आठवणींना
देउ नकोस थारा
नव्या अनुभवताना
वाटेल उगाच भारा
नव्याशिवाय फुलेल का
सुखाचा पिसारा
जुन्याला धरुन वाढेल
दु:खाचा पसारा
सुखाच्या रूंद कक्षा
आत्मसात करुन घे
दु:खाचा जुना नक्षा
व्यवस्थित सुधारुन घे
सुख,यश, किर्ती
पाडून घे पदरी
विसरुन जा मूर्ती
पाहिली होती हसरी
किरण क्षीरसागर.
|