नको साद घालू वार्‍या

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नको साद घालू वार्‍या

Kiran Kshirsagar
  नको साद घालू वार्‍या

नको साद घालू वार्‍या
बसलो मी बसू दे
किलबिलणार्‍या पाखरांना
उगा भिती दावू नको
चिमुकले घरटे त्यांचे
अस्तव्यस्त करु नको
काडी काडी जमवून
सुरेख किती विणले आहे
हळूवार वाहत ये
नको येवू घोंगावत
इवल्या इवल्या पिलांना
हळूवार झोका दे
तुझ्याप्रमाणे त्यांनाही
पंख जेव्हा फुटतील
तेही घेतील भरारी
उंच उंच आकाशी
नको साद घालू वार्‍या
बसलो मी बसू दे
गरीब बिचार्‍या माणसांना
आधार इवल्या कोपट्याचा
त्याचे खेळणे करुन तू
आनंद भारी मिळवू नको
धुमसत का होईना
पेटतात चुली त्यांच्या
घाईने तु जाऊन तेथे
आग अधिक भडकऊ नको
भडकून उठेल कोपटे
अन्‌ संसाराची होईन राख

       किरण क्षीरसागर, नाशिक