कपाळ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कपाळ

Kiran Kshirsagar
कपाळ

गोर्‍या गोंदल्या कपाळी
टिळा कुंकवाचा नाजूक
अर्थ जिवनाचा सांगतो
किती खुलवुन आजूक

सांगे बोडकं कपाळ
दु:खी निराश जीवन
आढ्या कपाळावरच्या
स्पष्ट दिसतात दुरुन

जणू दु:खाच्याच आहे
दर्‍या त्या खोल खोल
टिळा कुंकवाचा गोल
त्याचे खुप आहे मोल

गोरं गोंदलं कपाळ
कधी होवू नये मुंढं
सुखी आयुष्य त्याचं
सदोदित चालो पुढं

किरण क्षीरसागर