प्रितीशिखरावर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्रितीशिखरावर

Kiran Kshirsagar
    प्रितीशिखरावर

चालुन दोन पावले
थकलीस वाट प्रितीची
दूर किती अजुनी
आहे लक्ष आपुले
प्रितीशिखरावर जाण्याची
आपण पाहिलेली स्वप्ने
कशी काय विसरली
तु इतक्या सहजतेने
हि वाट जरी काट्यांची
परि फुलांकडे नेणारी
वेचत जाऊ काटे
पुढे चालत जाण्याला
एकांत शिखरावरचा
अन्‌ सुगंध फुलांचा
आपणास आहे गाठायचा
सर करुन शिखराला
घेत आधार मज बाहुंचा
चालत रहा न थकता
जाऊन तिथे घे मग
विसावा कुशीत माझ्या

     किरण क्षीरसागर.