|
देशाभिमान
होय तोच आहे मी
एकेकाळी देशाभिमान मिरविणारा
कारण, तेव्हा स्फुरलो होतो
बोस, गांधी, टिळक, नेहरु
आदिंच्या क्रांतीकथांनी
भगतसिंग, राजगुरु, सावरकर
आदिंच्या बलिदानाने
गोरगरिब,कष्टकरी जनतेवर
झालेल्या अन्यायाने
जुलुमाविरुद्ध बंड पुकारुन
प्राणांची आहुती देणार्यांमुळे
होय तोच आहे मी
एकेकाळी देशाभिमान मिरविणारा
परंतु पुरता मावळला आहे
आज माझा देशाभिमान
कारणे त्याची असंख्य आहेत
थोडक्यात सांगायचे तर,
पन्नास साठ वर्षे आजवर
झाली उपभोगुन स्वातंत्र्याची
पण अर्थ स्वातंत्र्याचा उमगला नाही
तेच दारिद्र, तिच उपासमार
अन् माणुसपण हरवलेली
माणसाची मानवजात.
किरण क्षीरसागर
|