जातीभेद

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जातीभेद

Kiran Kshirsagar
  जातीभेद

मी अमुक जातीचा
श्रेष्ठ माझी जात
तो तमुक धर्माचा
कनिष्ठ त्याचा धर्म
असल्या जातिभेदाने येथे
उसळती रोज नवे संघर्ष
आज जन्मणार्‍या चिमुरड्यास
कुठे ठाऊक असते जात
ठाऊक आहे ममता त्याला
नाही ठाऊक जात पात
मोठे होत असता असता
गिरवितो जातियतेचे धडे
आपणच त्यास शिकविलेले
पाऊल पडते त्याच दिशेने
जिथे नको जायला
विसरुनी मानवतेला
आपणच निर्मिल्या जाती
जातीभेद मिटविण्याचे आता
सत्कार्य घ्यावे हाती
"मानव" हि एकच जात
"मानवता" हा एकच धर्म
समजुन घ्यावे सर्वांनीच
हे सुख शांतीचे मर्म

             किरण क्षीरसागर