आस लागुन राहिली

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आस लागुन राहिली

Kiran Kshirsagar
 आस लागुन राहिली

मेघ जमले नभात
जल साठवुन उरी
वाट पाहत आहेत
कधी येईल गारवारा
आस लागुन राहिली
धरणीवर बरसण्या धारा

अश्रु साचले पापण्यांत
दु:ख साठवुन उरी
वाट पाहतो आहे
कधी येशील भेटीला
आस लागुन राहिली
गालावर खळाळण्या धारा

दु:ख होईल हलके
होता तुझी भेट
अश्रु जातील ढळुन
पापण्या मोकळ्या करुन
आस लागुन राहिली
आपल्या भेटावया नजरा

              किरण क्षीरसागर