मृगधारा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मृगधारा

Kiran Kshirsagar
     मृगधारा

मृगधारांनी सुरु होतो
पावसाचा श्रीगणेशा
मृग येताच मृत्तिकेचा
सुगंध भरतो आसमांत

प्रखर उन्हाने तापलेली
चिरा भेगांनी फाटलेली
भुमीही टाकते उसासा
मृगसरींच्या शिडकाव्याने

उष्म्याने व्याकुळलेला
वाट सरींची पाहणारा
बळीराजाही सुखावतो
मृगधारांच्या ओलाव्याने

पाण्याच्या कमतरतेने
करपणारे वृक्ष वेली
पुन्हा नव्याने पालवती
मृगधारांच्या आगमनाने

चैतन्याने भरते सृष्टी
हिरवळ दाटते  चहुकडे
गंध फुलांचा सामावतो
राहती सारे आनंदात

                  किरण क्षीरसागर