जरा नाही कळले

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जरा नाही कळले

Kiran Kshirsagar
 जरा नाही कळले

कधी आला श्रावण
कधी गेला श्रावण
जरा नाही कळले

कधी बरसल्या सरी
कधी चमकले ऊन

किती केले उपवास
शंभुरायाला स्मरत

बेल फुले वाहिली
किती नंदी पिंडीवर

गेले होते वारुळाला
नागोबास पुजायला

किती सजवुन पोरांनी
बैल पोळ्याचा पुजला

रानी डोकावती अंकुर
किती बहरुन आज

किती वाहतेय धार
खळखळत नदीची

कधी आला श्रावण
कधी गेला श्रावण
जरा नाही कळले

        Kiran Kshirsagar