आस कुणब्याची

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आस कुणब्याची

Kiran Kshirsagar
आस कुणब्याची

जाउ दे गं शेजी बाई
माझं भरलं आवन
लगबगीनं जाऊन
करिते भाताची लागण

चिखलात बसतं
रोप कसं रुतुन
जाईन उशिरा तर
ओल जाईल सरुन

पिक वर्षाचं एक
घेऊ दे राबुन
ओढ कामाची सरता
घास सुखाने खाईन

रोप चिखल पाण्यात
बघ येईल तरारुन
पोटी पालवीत त्याच्या
धान जाईल भरुन

आस एकच मनात
असे आम्हा कुणब्याच्या
घास पोटाला मिळावा
पोटभर सार्‍या दुनियेच्या

किरण क्षीरसागर