शब्दाविष्कार

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शब्दाविष्कार

Kiran Kshirsagar
    शब्दाविष्कार

शब्दाविनाच झाली साकार
जरी प्रित सखे आपुली
परि अबोल त्या वचनांना
कुठवर अबोल ठेवणार

मी बांधतो नित्य मनोरे
उंच उंच शब्दांचेच
मुखातुन त्यांना वदवु
नाही शकत स्वत:च्या

अविष्कारितो म्हणुन त्यांना
शुभ्र कागदाच्या रेषांवर
भिती मज वाटते
लेखणीतील शाई संपण्याची

खेळ मुक्या भावनांचा
अबोलच असेल ठेवायचा
तर स्पर्शाने का होईना
डाव पुरा कर त्याचा

कगदावरिल अविष्कार
वाचुन तु कंटाळशील
मी नाही कंटाळणार
सरतील पाने जरी

तु लोचनात माझ्या
बघ डोकाऊन जराशी
स्पष्ट होतील सार्‍या
आपोआप मुक्या भावना

अथवा अविष्कार तुही
कागदावर शब्द भावना
तुझ्या माझ्या साकारतील
प्रितीच्या नव्या कल्पना
                किरण क्षीरसागर