घनास विनवणी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

घनास विनवणी

Kiran Kshirsagar
   घनास विनवणी

निळ्या निळ्या नभावर
काळ्या घनांचे गोंदण
घन बरसेना काही
मन करिते रुदन

काळ्या काळ्या भुईमध्ये
बीज हिरवे अंकुरले
घन बरसेना काही
पान कोवळे कोमेजले

निळ्या जांभळ्या घनाला
करु किती विनवणी
नको जाळुस मनाला
शिवारात भर पाणी

नवा दिवस उगवतो
रोज आशेचा माझ्यासाठी
देव पाण्यात बुडवितो
घन भुईवर बरसण्यासाठी

                  किरण क्षीरसागर