मित गिताचे

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मित गिताचे

Kiran Kshirsagar
   मित गिताचे

दु:ख मनात सलते
आठवेना मला कुणाचे
भय कितीक पेलते
ऋण भारावल्या मनाचे

दु:ख अजुनी झेलते
भरण्या पाट सुखाचे
पाटातुनी पुन्हा वाहते
जल साचल्या तळ्याचे

मन वार्‍यावरती डुलते
गुज सांभाळुन मिताचे
मित तरीही राहते
होत नाही कुणाचे

मन कधीही ढळते
शब्द जुळविन्या गिताचे
गीत त्यातुनी स्फुरते
माझ्या हळव्या मनाचे

              किरण क्षीरसागर