अनुभवाचे बोल

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अनुभवाचे बोल

Kiran Kshirsagar

  अनुभवाचे बोल

बोलतो बोल मी सदा अनुभवाचे
जाणतो धोके येथे संभाव्य उद्याचे
हे म्हणणे माझे नाही हो वरवरचे
जाणतो अनोखे ढंग लहरी जगाचे

होईल काय आता पुढ्यात तुझ्या
उमगते आधीच धोरणी मनास माझ्या
जीवनी तसेच अगदी घडतेही तुझ्या
रुजते खोलवर जसे मनात माझ्या

झेलले आजवर चार अधिक पावसाळे
सहज पार केले मी तापलेले उन्हाळे
जोडले मनाशी त्या दीनांचे जिव्हाळे
चिंतले ना मनाशी कधी कुणाचे काळे

करुन घे फायदा माझ्या अनुभवाचा
दाखव मोठेपणा तु तुझ्याही मनाचा
ठरव तुच भरवसा कुणावर ठेवायचा
ठेवीन मान मीही तुझ्या संवेदनांचा

                     किरण क्षीरसागर.