त्या क्षणाला

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

त्या क्षणाला

Kiran Kshirsagar
    त्या क्षणाला
जवळी तुझ्या येतो मी
अबोल होऊन जातो मी
शब्द न फुटती ओठावरती
वरवरचे हसु गालावरती
सुचेनासे होते काही
त्या लाजर्‍या क्षणाला

तुही तशीच उदासवेडी
सांगत नाही आवडी निवडी
भावना तशाच हृदयी दडवशी
ओळख नाही जणु माझ्याशी
सांगायचे होते काही
त्या हळव्या क्षणाला

तुझ्यापासुन दुर येतो
खुप खुप अधीर होतो
जीव होतो वेडापिसा
धरत नाही धीर जरासा
कसे त्यास सांगु काही
त्या विरहाच्या क्षणाला

            किरण क्षीरसागर