दुष्काळ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दुष्काळ

Kiran Kshirsagar
दुष्काळ

एकामागुन एक आता
तिसरे वर्ष लोटले आहे
पाण्यावाचुन सारे आता
दुष्काळाने पेटले आहे
पहिल्या वर्षी दुष्काळ होता
दुस-या वर्षी अतिदुष्काळ
तिस-याही वर्षी भीषण दुष्काळ
सुरवातीस पडतो पाऊस
पल्लवित करतो आशा
घरातील पेरुन धान्य
स्वप्न पाहतो बळीराजा
पावसाच्या नसते गावा
त्याने गुंडाळलेला गाशा
मग सुरु होतो पाऊस
शेतका-यांच्या आसवांचा
आग ओकली जाते डोळ्यातुन
शेतातिल करपणा-या पिकांची

          किरण क्षीरसागर.