आसवं

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आसवं

Kiran Kshirsagar
   आसवं

डोळ्यात भरुन आलेल्या
आसवांना कसे आवरु
ओघळतातच तरिही
जरी बंध घातले पापण्यांचे

कातरवेळ होताच
नकळत दाटुन येतात
काही घडण्याअगोदर
गालावरती निखळतात

पुसले पुन्हा पुन्हा
तरिही निखळतातच
हुंदका दाटता मनी
वेग त्यांचा वाढतो अजुनी

सुन्न झालेल्या मनाला
ओलेचिंब होवुनही
डोळ्यासमोर तरळना-या
दृश्याचे भान नसते

स्पर्श हळुवार कुणाचा
जाणवतो उशीरा कधी
तेव्हा कुठे अनावर होतात
लगबगीने आसवं

        किरण क्षीरसागर.