अनुबंध

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अनुबंध

Kiran Kshirsagar      अनुबंध

माझ्या पुढे नव्हती
कधी व्यथा कशाची
पण लागली मनाला
बोचणी येथे सदाची

मी जपले अनुबंध सारे
माझ्या सभोवतीचे
तरिही तुटुन गेले
नकळत माझ्या कधीचे

जोडु पुन्हा पाहिले
मी जरी आत्मियतेने
उपेक्षाच पडली पदरी
जाणीवपूर्वक प्रयत्नाने

मीही आत्मसात केले
जगने उसनेपणाचे
साध्य तरी ना झाले
उद्दिष्ट माझ्या मनाचे

              किरण क्षीरसागर.