बाप

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बाप

Kiran Kshirsagar
बाप असतो मुळ आपल्या जीवनाचे
तोच घडवितो आस्तित्व प्रत्येक लेकाराचे
त्याचाच अंश भिनतो प्रतेकाच्या देहात
वाढतो प्रत्येकजण त्याच्याच छत्रछायेत
बाप असतो जणू करवंटी नारळlची  
वरुन असते कठिण ,कठोर अन
आतुन मात्र असते गोडी खोबरयाची
बाप असतो खंबीर आधार,
 कधी न डगमगणारा  
बाप असतो दीपस्तंभ,
 सन्मार्ग दाखवीणारा  
बाप असतो एकमेव जगात ,
हित मुलांचे चिंतनारा
तोच बघू शकतो केवळ मुलांना,
 स्वत:पेक्षा मोठे होताना
बाप तेवतो ,जळतो सदैव आतल्या आत
दु :ख कितीही असले तरी ठेवतो मनात
तो वेचतो आयुष्य सारे फ़क्त लेकारांसाठी
कष्टत असतो रात्रं दिवस त्यांना घडविन्यासाठी
स्व:ता राहतो उपाशी अन भरवितो मुलांना
सोसतो उन्हाचे चटके अन झाकतो मुलांना
सर्वांनीच दुर्लाक्षिला आहे आजवर बाप
कुणीच करत नाही त्याच्या कष्टांचे मोजमाप
बाप होता म्हणुन आस्तित्व आपले आहे
त्याच्या कष्टांचे आपणास आता पांग फेडायचे आहे
प्रेम त्याचे आपणास कधी बरे कळते ?
प्रेत त्याचे जेव्हा सरणावर ढणाढणा जळते  
मग आठवतो बाप आपल्यातुन निघून गेल्यावर
भासते उणीव त्याची आपण पोरके झाल्यावर .
                 
                                 किरण क्षीरसागर
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप

cowstubh_a@yahoo.com
chaan!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप

Balasaheb nagare
Good afternoon Kiran,
very nice, Father always graet.
bapu1958@gmail.com