पाऊस

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पाऊस

मनिषा नाईक (माऊ)
पाऊस

डोळ्यात बंद माझ्या होता अजून पाऊस
भुलवून पापण्यांना गेला निघून पाऊस ||धृ ||

झालाय ओळखीचा आवाज या सरींचा
बघ अंगणात माझ्या गेला रमून पाऊस ||१ ||

आभाळ रंगलेले रंगात काजळाच्या
शृंगार हा नभाचा गेला करून पाऊस ||२||

बेधुंद नाचतो बघ मनमोर ही सुखाचा
मी चिंब चिंब होता गेला गळून पाऊस ||३||

पाण्यात साचलेल्या प्रतिबिंब पाहिले मी
माझ्याच त्या छबीला गेला भुलून पाऊस ||४ ||

बघ ओढ अंतरीची आहे अजून ओली
हा पूर वाढलेला गेला भिजून पाऊस ||५ ||

माझ्या खुळया मनाला लावून वेड भलते
ही ओंजळी सुखाची गेला भरून पाऊस ||६ ||

शब्दात आज माझ्या आल्या सरी कुठोनी
गीतात भावनेच्या गेला रुजून पाऊस ||७ ||


- मनिषा नाईक (माऊ )
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पाऊस

पल्लवी सावंत
छानच!