विरहधारा

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

विरहधारा

Kiran Kshirsagar


     विरहधारा

सोसाट्याचा आला वारा
त्यापाठोपाठ पाउस धारा
क्षणात झाले ओले प्रांगण
तसेच माझेही भिजले मन

या क्षणी मला तुझी
खुप खुप निकड भासली
पावसाकडे एकटक बघत
रात्र सारी जागुन काढली

पाउस धारा झेलत आपण
विसरलो असतो दु:खी क्षण
प्रफुल्लीत झाले असते
उदासवाणे माझे मन

मज आवडणा-या पाउस धारा
तुझ्याविना वाटती नकोशा
पण तु नाही जवळी म्हणुन
मजबुरीने करतो आपल्याशा

तुम्हा दोहोंनाही दुर सारुन
असह्य होईल जगणे फार
स्विकारुन या पाउस धारा
म्हणतो त्यांना विरहधारा.

             किरण क्षीरसागर.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: विरहधारा

shobhana
किरण क्षीरसागर लेखित  विरहधारा अप्रतिम आहे
त्यातल्या प्रत्येक भावना आणि शब्द मनाला खूप भावतात
खूप छान लिहील आहे तुम्ही