नवचैतन्य

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नवचैतन्य

Kiran Kshirsagar

    नवचैतन्य


पाउस आला पाउस आला
नदया, निर्झर वाहु लागले
कडया कपा-यातुन निखळत
डोंगर पायथी तळे साचले

नागमोडी वळणे घेत
घाट हिरवा झाला दुतर्फा
उंचावरुन खोल दरीत
फेसाळत कोसळले धबधबे

हिरवी वस्त्रे लेवुन डोंगर
जणु स्वागता सज्ज झाले
कुरणे दाटली पठारावरती
हिरव्या हिरव्या मखमालीने

शेळ्या,मेंढ्या,गुरे,वासरे
चौफेर हुंदडत चरु लागली
बाल गुराखी त्यांच्यामागे
विटी दांडु खेळण्यात रंगले

नकळत दिनकर ढगांआडुन
निघुनी जातो मावळतीला
भान कुणाला नसते त्याचे
सृष्टीच्या या नवचैतन्याने

          किरण क्षीरसागर.