बरबाद

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बरबाद

Kiran Kshirsagar
     बरबाद

बरबाद व्हायचे नव्हते
तरीही झालो बरबाद
सारे काही उमजत असुनही
विष प्राशिले आज.

विस्तव फुलला दिसतो तरिही
स्पर्श त्यासी करतो
अनमोल जीवनाची स्वत:च
राख रांगोळी करतो.

का स्फुरतात कुविचार
एकसारखे माझ्या मनात
वासनांच्या जाळ्यामध्ये
स्वत:च जातो गुंतत.

मी समजतो भले बुरे
जगात काय आहे
भल्याला सोडुन तरिही
वाईटामागेच धावतो.

ठाऊक आहे मजला
नितीमुल्ये जीवनाची
झुगारुन देतो त्यांना
अन्‌ पुढे चालु लागतो.

इतके स्वैर वागणे
का बरे मी शिकलो
वासनांचा जन्म माझ्याच
मनात का होतो.

  किरण क्षीरसागर.