नको रे मना

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नको रे मना

Kiran Kshirsagar


  नको रे मना

नको रे मना नको
स्पर्श वासनांना करु
पापी वासनांचे नको
घडे अधिक भरु

क्षणिक मोह कशाला
बाळगतो मनातुन
उठविल तो तुला
कायमचा माणसातुन

संयम धर स्वत:शी
पुढे चालत जायला
वासना नको उराशी
अस्तित्व टिकवायला

आकर्षिले जरी तुला
जगाच्या मोहमायेने
झिडकार तु तयाला
अगदी सहजतेने

स्वार्थ असतो दडलेला
आकर्षित करण्यामागे
जाशिल तेथे फसला
जाऊन त्यांच्यामागे.

       किरण क्षीरसागर.