मी आणि ती

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मी आणि ती

पल्लवी सावंत
       'मी' आणि 'ती'

'मी' नक्की कोण?प्रश्न नेहमी सतावतो,
दोन 'मीं'च्या भांडणात.. अदृश्य 'मी'च भावतो!
मला 'मी' म्हटलं ;तर दुसरीला 'ती' म्हणू?
सूर असले माझे;तरी वाजवते तीच वेणू!
मी शांत असले की..तिची अखंड बडबड'
एकदम आगाउपणा करण्याची;तिची नेहमीचीच धडपड।
मी म्हटलं नाही; की ती म्हणणार 'हो'.
माझ्या अस्वस्थ मौनात तिचा नेहमीचाच टाहो।
माझ कौतुक झालं;की ती खडबडून जागी होते.
म्हणते, हुरळून जाऊ नको  गं;हे सारे आहे थिटे।
दिला कुणी कधी..जिव्हारी लागणारा घाव...
तीच उत्साहाने सांगणं;झेल झेल तो. यांचा असायलाच  हवा सराव।
मी कुणावर हसले;की ती माझ्यावर हसते,
या विचित्र गुंत्यात मी नेहमीच फसते।
मी क्षितिजाकडे पाहताना..ती क्षितिजापार जाते,
मी ओंजळ चाचपताना..ती दुथडीभरून वाहते।
मला ठेच लागली की ती म्हणते व्वा!!
झाला सुरु वाटतं..हिचा प्रयत्न नवा!
यावेळी होईल न पूर्ण? ती म्हणायचं म्हणून म्हणते,
तिच्या या शंकेने मी मनातल्या मनात कण्हते।
माझ खचलेपण तिला अनेकदा जाचतं,
कारणमीमांसा करताना तिचं-माझं नेहमीच वाजतं।
माझी तिची आहे प्रत्येक श्वासागणिक भेट,
कनेक्शनच आहे हो आमचं.. पारदर्शी..थेट!
मला निर्णयाप्रत पोहोचवणं  तीच ठरलेलं काम आहे,
माझ्या अविवेकी वेगावर तिचा संयमी लगाम आहे।

                         -पल्लवी सावंत
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी आणि ती

sunil samant
khup chhaan. Sandeep Kharenchi kavitaa aaThavali. to kaTTyaavar basato.. shil vaajavato. paN tujhyaa kavitet aaNi tyaa kavitet khup farak aahe. Yaa kavitet do sakhkhi mana aahet. viruddha naahit.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी आणि ती

पल्लवी सावंत
धन्यवाद! Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी आणि ती

Sagar
In reply to this post by पल्लवी सावंत
नमस्कार.
खूप छान आहे कविता. खरंतर एखादी कविता जेंव्हा भावते तेंव्हा त्या कवितेला प्रतिसाद काय द्यावा हे कळत नाही. आणि कवितेची दुस-या कुणी समीक्षा करणे म्हणजे कधीकधी मला कवितेचं चिरफाड केल्यासारखे वाटते. म्हणून 'खूप छान' एवढेच लिहू शकलो.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी आणि ती

पल्लवी सावंत
(कवितेला दाद मिळते तेव्हादेखील असंच वाटत; म्हणून) आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार