उमलु द्या कळीला

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

उमलु द्या कळीला

kiran Kshirsagar

      उमलु द्या कळीला

मुलगी म्हणुनी भ्रुणाचीच हत्या
शुन्यातच जिरविती कळीला उमलत्या

लादेल कुणी तुमच्यावर सक्ती
जागृत ठेवा सदैव तुमची भक्ती

जाणा हो दु:ख वांझोटेपणाचे
वरदान लाभले तुम्हा मातृत्वाचे

सहज लाभले तुम्हा मातृत्व सुखाने
म्हणुनी प्रतारणा अशी निष्ठुर मनाने

कशास करता तुम्ही छेडखानी
भकास होतिल स्वप्ने, विरेल कहाणी

पाजळेल काय तो दिवा वंशाचा
कि जाळेल तो तुमच्याच घराला

आधीच ठरविता कसे भवितव्य
उमलल्यावर होईल जरुर भव्य-दिव्य

नका समजु तिला धन परक्याचे
तिही करेल असेच कल्याण जगाचे

उमलु द्या कळिला सुगंध पेरण्याला
तुमचेच आयुष्य सुखी करण्याला

                 किरण क्षीरसागर.