संगीनी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

संगीनी

kiran Kshirsagar


       संगीनी

अवखळ खट्याळ अशी संगीनी
पदर सारखा सावरायची
डोळ्यात अंगार नजरेत विखार
हळुच ईशारा करायची
स्पर्श करारा अंगावर शहारा
अंग मोहरुन टाकायची
ऒठ गुलाबी दातांनी दाबत
घायाळ जिवाला करायची
गाल गोबरे भरुन तोबरे
हर्षाचे फुलोरे फुलवायची
कानात झुमका मानेला झटका
तो-यात मिरवत चालायची
नाकात नथनी दिसायला देखणी
मुरडत मुरडत बसायची
हातात कंगण वाजवुन किणकिण
चाहुल स्वत:ची लावायची
पायात पैंजण वाजवत झुनझुन
गावभर नाचत फिरायची
केसांच्या वेण्या वेण्यांत गजरा
खोचक नजरा झटकायची
कुंकवाचा टिळा कपाळी मोठा
उजळ माथ्याने मिरवायची
अवखळ खट्याळ सर्वांशी सकळ
खोडया काढत रहायची
प्रेमळ मधाळ तशीच जवळ
जिवाला जिवही लावायची
कधी खट्याळ कधी प्रेमळ
सर्वांना झुलवत ठेवायची
अवखळ खट्याळ अशी संगीनी
पदर सारखा सावरायची
                       
                   किरण क्षीरसागर.