प्रेम मिळविण्या .....

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्रेम मिळविण्या .....

kiran Kshirsagar


     प्रेम मिळविण्या .....

करु नकोस गल्लत ऐक माझे राणी
ओंजळीने कुणाच्या पिऊ नकोस पाणी
असतात इथे अनेक वरवर गोंजारणारे
लपवतात आपल्यापासुन रुप स्वत:चे खरे

प्रेम कधी नसते दिसत वरच्या अंगाला
मिळवण्यासाठी लागते भिडावे थेट अंत:करणाला
प्रेम कधी नसते केवळ फक्त अपेक्षा
मिळेल तुम्हास खुप करु नका तुम्हीही उपेक्षा

प्रेम तुमच्यावर करणा-यास असते तुमची फिकीर
त्यासाठी सोडत नाही तोही त्याची लकिर
प्रेम मिळावे म्हणुन करावा त्याचा आदर
तोही करेल तुमची तेवढ्याच मायेने कदर.

                     किरण क्षीरसागर.