स्वच्छंद मन

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

स्वच्छंद मन

Madhura Khalatkar
आज नभ कसे शुभ्र वाटते
वादळानंतरची शांतता भासे
दाटलेले घन आज मोकळे झाले
उंच भरारी आज घेई पाखरे


माझेही काही असेच झाले
ओठावर आले आनंदी गाणे
सारे दडपण सारे ओझे
पिसासारखे उडुनी गेले


मन हे कसे वेडे असते
येथे तेथे रमत असते
प्रवाहात ते वाहत जाते
संथ होण्याची मग वाट पाहते


कोमेजलेले मन फुलून गेले
पक्ष्यासारखे उडू लागले
स्वधुंदीत ते नाचू लागले
वर्तमानात आता जगू लागले
मधुरा खळतकर