आस त्याला .....

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आस त्याला .....

kiran Kshirsagar

     आस त्याला .....

काळ्या ढेकळाचा मळा
सोसतो उन्हाच्या झळा
आस त्याला पावसाची
नवसाला पावण्याची

माहित नाही अजुन किती
भाजेल उन्हाने माती
आस त्याला भिजण्याची
भिजुन विसावण्याची

विसावुन होईल थंडगार
होईल त्याचा हलका ज्वर
आस त्याला पेरण्याची
बिजामधुन अंकुरण्याची

अंकुरता फुटेल पालवी
तिच उभा शिवार डोलवी
आस त्याला बहरण्याची
बहरुन दाणे भरण्याची

रास दाण्यांची खळ्याला
मळा आज गहिवरला
आस त्याला भुकेल्यांची
भुक पोटाची शमविण्याची

     किरण क्षीरसागर.