देवत्व

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

देवत्व

kiran Kshirsagar

     देवत्व

भजसी पुजसी त्या देवाला
केवळ भितीपोटी
भक्ती तुझी विचार मनाला
किती खरी-खोटी.

संकटांचा येता घाला
जासी त्याच्या भेटी
व्यापार उदीम असे चांगला
भरसी स्वत:ची पेटी.

आपोआप चालत आली
अव्याहत जग रहाटी
कशी काय टिकुन राहिली
युगानुयुगे हि सृष्टी.

आस्तित्व त्याचे चराचरात
नको तपासुन घेवु
जाऊ नकोस भले मंदिरात
मना-मनातुन पाहु.

    किरण क्षीरसागर.