प्राक्तन

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्राक्तन

kiran Kshirsagar

         प्राक्तन

मशगुल असती करण्यामध्ये
जो तो आपणच आपले रंजन
कुणीही नसते त्या घडीला
डोळ्यात घालण्या त्याच्या अंजन

म्हणुनी करती त्या धुंदीत
जित्या जागत्या देहाचे भंजन
प्राण जाता निघुनी त्यातुन
मग करु लागती प्राक्तन

मिळविल काय मोल असे ते
निर्जीव देहावरचे प्राक्तन
जोवर आहे देहात प्राण
तोवर करा त्यावर मंथन

मिळतिल आशिष तृप्त जिवाचे
जागे राहता त्याचे स्पंदन
आदर्श घेईल नवी पिढी
करिल तुम्हाला मानाचे वंदन

          किरण क्षीरसागर.