दुरुन डोंगर साजरे

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दुरुन डोंगर साजरे

kiran Kshirsagar

    दुरुन डोंगर साजरे

प्रात: उठता समोर दिसतो
उभा मोठा निधडा डोंगर
वस्र हिरवे पांघरलेला
घालुन वळसा नदी तयाला
गात जाते झुळझुळ गान.

खेळवतो अंगा खांद्यावर
गुरे,वासरे,बाल गुराखी
नखशिखांत हिरवा होऊन
सुखावितो डोळ्यांस माझ्या
भरते मनात नव प्राण.

मज वाटते खेळावयास जावे
आपणही झटकुन आळसा
कुंपणे वाटेतली तोडुन सरळ
झेप घ्यावी त्याच्या अंगावर
विसरुन जावे जगाचे भान.

दुर जरी तो नसला फारसा
पण मीच असतो व्यस्त सारखा
समजुत काढुन स्वत:च्या मनाची
म्हणतो मी स्वत:च्याच मनाशी
दुरुन डोंगर साजरे छान.

       किरण क्षीरसागर.