थरकाप

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

थरकाप

kiran Kshirsagar

         थरकाप

ढग काळे बरसती जेव्हा
निळे लोचन पाणावती
गंध फुलांस सुटता भारी
थकल्या मनास मिळे उभारी.

ओले चिंब होऊन जाते
सारे आतुन बाहेरुन
किलबिलणा-या पाखरांचे
घरटे उघडयावरचे.

मनही भिजुन चिंब होते
उघडयावर धाव घेते
सोसो करीत वाहतो वारा
थरकाप मनाचा उडतो.

खळाळत वाहते नदी
अंगावर उठती शहारे
ढग दाटती नभात जेव्हा
मनही भारावते लगेच.

व्याकुळ होते आठवणींनी
आणि शुद्धही हरपते
दुरुन येरे लवकर सजना
वाट पाहुनी थकले आता.

                   किरण क्षीरसागर.