समृद्धीची गाणी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

समृद्धीची गाणी

kiran Kshirsagar

      समृद्धीची गाणी

श्रावणसरी बरसल्या
ओले चिंब झाले सारे
झाडे वेली बहरल्या
गवतास फुटले धुमारे
भरुन उरला नभोवनी
सुगंध फुला कळ्यांचा
घोस फळांचे झुकले
फांद्यांवरुनी खाली
उन पिवळे चमकते
हिरव्यागार शेंडयावरती
हाका मारतो राघु
साद घालते मैना
हिरवा झाला परिसर
स्वप्न हिरवे साकारले
डोलु लागला शिवार
जोंधळ्याला आला भर
चिव चिव गाती पाखरे
सुख समृद्धीची गाणी
बळीराजाही आनंदाने
फिरवु लागला गोफणी.

     किरण क्षीरसागर.