सुपंथ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सुपंथ

kiran Kshirsagar

        सुपंथ

आभाळाएवढ्या विस्तीर्ण
रुंदावलेल्या आशा आकांक्षा
स्वप्नांची मजबुत किनार
त्यांना लगडलेली
शिखराएवढे उत्तुंग
उंचावलेले ध्येय
सुखासाठीच नेहमी का
अविश्रांत धडपड
समाधान पुरते होत नाही
मग कसे मिळणार सुख
शिखरापेक्षाही उत्तुंग
ध्येय जरुर असावे
हव्यास सारा सोडुन द्यावा
चित्ती समाधान मानावे
होतातही पुर्ण अपेक्षा
नाही असे नाही
प्रयत्न असावे प्रामाणिक
यत्न न करताच जर
अवलंबिले कुमार्ग
ध्येयाजवळ जाऊनही
पुन्हा परतीचा मार्ग
काट्यांचीही फुले होती
सुपंथे चालता
पर्वत पातकांचे सरती
राम नाम उच्चारता.

        किरण क्षीरसागर.