कोकण फिरा रे कोकण फिरा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कोकण फिरा रे कोकण फिरा

kiran Kshirsagar
कोकण फिरा रे कोकण फिरा

कोकण फिरा रे कोकण फिरा
मनी आनंदाचे कोठार भरा
निसर्गाची झाली उधळण इथे
मन आणि चित्त प्रसन्न होते
सागराचा आहे भव्य किनारा
लाटांचा होतो अविरत मारा
लाल लाल कशी माती इथली
शहाळेही जणु अमृताने भरली
उंचच उंच  इथे नारळ पोफळी
खायला चविष्ट भात आणि मासळी
हिरवीगार मस्त घनदाट झाडी
माणसाला माणसाची आहे इथे गोडी
आंबा फणस नि काजुच्या बागा
पाहुन आल्यावर मग दुस-यास सांगा
नदी नाले आणि सागर खाडया
मजेने चालतात तिथे शिडाच्या होडया
पाण्यात बांधले दुर्ग अति भव्य
पाहताच सुचते आम्हा सुंदर काव्य
डोंगर द-या नि घाटाचे रस्ते
हिंडताना इथे भ्रांत ना उरते
वाटा आणि वळणे इथली नागमोडी
जोडत जाती अलगद वसत्या आणि वाडी
बाधत नाही इथली थंडगार हवा
हर्श होई चाखताना मधुर कोकणमेवा
आंब्याला आहे इथे अवीट मधुर गोडी
चाखली कितीही तरी वाटते थोडी थोडी
कोकण फिरा रे कोकण फिरा
मनी आनंदाचे कोठार भरा

                       किरण क्षीरसागर.