कष्टक-यांनो

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कष्टक-यांनो

kiran Kshirsagar

   कष्टक-यांनो  

कष्टणा-या हातांना
देईना कुणी आसरा
लागु देत नाही इथे
कुणी अंगास कासरा

स्वार्थाचेच रचतात
उंच इथे इमले
घेणे देणे नाही त्यांसी
कोण उपाशी झोपले

वाटत असते त्यांना
आपणच व्हावे धनी
दीन रहावे इतरांनी
हेच त्यांच्या मनी

कष्टणा-या जिवांवर
साम्राज्य त्यांचे उभे
कष्टक-यांनो जागे व्हा
दणाणुन द्या त्यांचे धाबे

           किरण क्षीरसागर