शोध मनाचा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शोध मनाचा

kiran Kshirsagar

   

   शोध मनाचा
स्वैर हिंडते मन माझे
ना नजरेस कुणाच्या पडते
शोधत असते नजरा
का कुणी आपणास भावते

माझा मलाही लागत नाही
थांगपत्ता माझ्या मनाचा
घुटमळत राहते कुठेही
लागता वारा समविचारांचा

मन माझे हळवे तसे
हळ्व्याचाच त्याला ध्यास
आणि कठोरही आहे जरासे
करते दुर्जनांचा दुस्वास

रिते आहे अजुनी अनेक
कंगोरे मनाचे माझ्या
मी शोधतो आहे म्हणुनी
बंध जोडणा-या कड्या मैत्रिच्या

मनास माझ्या आहे जिव्हाळा
फक्त एकच कवितेचा
विश्वास टाकतो तिच्यावर सगळा
तिच्या मधुनच उलगडण्याचा

         किरण क्षीरसागर.